पावसाळ्यातील आमचं घर 😍 | आजूबाजूचा परिसर आणि बरंच काही - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही यावेळेस पावसाळ्यात कोकणातील गावी आहोत. पावसाळ्यातील माझं घर आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासारखा असतो. माझ्या घराच्या मागे व्हाळ आहे त्याला भरपूर पाणी येतं. आमच्या गावी मुसळधार पाऊस लागतो. गेल्या काही दिवस आमच्या गावी मुसळधार पाऊस लागला. माझ्या लहानपणीच्या पावसातील आठवणी जाग्या होतात. माझं घर पावसात कसं दिसतं, आजूबाजूचा परिसर कसा आहे, यासोबत माझं गावचं घर आतून कसे आहे हे दाखवले आहे. आमचं घर 26 वर्ष जुनं आहे. आता नवीन घरे बनतात ती वेगळी असतात. आमच्या घरासमोर अंगण आहे. अंगणात आम्ही पडवळ आणि दारची भाजी लावली आहे. आम्ही पाऊस येताना पाहतो. पाऊस पडायला लागला की खूप बदल होतात. आमच्या घराच्या बांधावर वनस्पती जगतात. प्रांजु प्रदनु यावेळेस पावसात गावाला आहेत. प्रदनु अजिबात आमचं ऐकत नाही. प्रदनु पावसात जाऊन भिजतो आणि मजा करतो. गावी आम्ही अळंबी भाजी तयार केली होती. गावाला अळंबी खूप सापडतात. आम्ही अळंबी शोधायला रानात जातो. आमचं पावसाळ्यातील घर, घराच्या आजूबाजूला असलेला परिसर कसा आहे हे दाखवले आहे. प्रदनु आणि प्रांजु पावसाच्या पाण्यात भिजतात ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PavsalyatilAamchaGhar #GavachaGhar #Kokani GharInMonsoon #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет पावसाळ्यातील आमचं घर 😍 | आजूबाजूचा परिसर आणि बरंच काही - Ambavali, Mandangad (Konkan)
Пікірлер: 410