शीर खुरमा स्पेशल रेसिपी | Sheer Khurma Special Sweet dish |
साहित्य:
1. 50 ग्रॅम बारीक पातळ भाजक्या शेवया
2. दीड लिटर म्हशीचे क्रीम वाले दूध
3. 1/2 बाउल बारीक चिरलेला बदाम
4. 1/2 बाउल बारीक चिरलेला पिस्ता
5. 1/2 बाउल बारीक तुकडे काजूगर
6. 1/4 बाउल चारोळी
7. 1/2 बाउल मनुका
8. 1 बाउल बारीक चिरलेला काळा खजूर
9. .1 मोठा चमचा वेलची पावडर
10. 150 ग्रॅम साखर
11. 2 चमच साजूक गाईचे तूप
12. केशर
कृती: प्रथम एक स्टीलचे जाड पातेले गरम करून घेतले मध्यम आचेवर .पूर्ण पातेलं तापल्यानंतर आपल्याला तिथे 50 ml पाणी घालून घेतले. त्यानंतर आपण दीड लिटर क्रीम वाले दूध घालून घेतले. दूध पूर्णपणे एकसारखे ढवळून घेतले कडेने पण एकसारखे ढवळून घेतले . दुधावर साय न येऊन देता एकसारखे ढवळत राहिले. घेतलेल्या दुधामधील पाव लिटर दूध पूर्ण आटवून घेतले. त्यामुळे दूध घट्ट झाले. नंतर दुसरे एक पसरट भांडे घेतले त्यामध्ये दोन चमचा गाईचे साजूक तूप घालून गरम करून घेतले त्यामध्ये बारीक पातळ भाजक्या शेवया घालून व्यवस्थित ब्राऊन कलर येईल अशा भाजून घेतल्या.भाजल्यानंतर एका भांड्यात काढून घेतल्या. दुधामध्ये उकळत्या केशर घालून घेतले ते पण एक सारखे दुधामध्ये ढवळून घेतले. बदामाचे बारीक केलेल्या कापा अर्धा वाटी घालून घेतल्या त्या पण एक सारख्या दुधामध्ये ढवळून घेतल्या. पिस्ता बारीक केलेला कापा अर्धा वाटी घालून घेतल्या. काजूगर पण बारीक तुकडे आपण अर्धा वाटी घालून घेतले ते पण एकसारखे ढवळून घेतले. 1/4 वाटी चारोळी घालून घेतली ती पण एकसारखी दुधामध्ये ढवळून घेतली .मनुका अर्धा वाटी घालून घेतल्या ते पण एकसारखे आपण ढवळून घेतले. काळा खजूर एक वाटी घालून घेतला तो दुधामध्ये पूर्ण मऊ पडेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेतला. नंतर आपण 50 ग्रॅम शेवया भाजलेला घालून घेतल्या .त्या आपण दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घेतल्या शिजल्यानंतर आपण एक मोठा चमचा वेलची पावडर घालून घेतली ती पण व्यवस्थित दुधामध्ये ढवळून घेतली. इथे आपला छान पैकी टेस्टी असा सगळ्यांना आवडेल असा इथे आपला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत आवडीने खातील असा शीर खुरमा तयार झाला आहे. थंड झाल्यानंतर दोन बाऊल घेऊन त्यामध्ये आपण शीरखुरमा काढून घेतला आहे. त्यावर आपण बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत.
टिप्स:
1. केव्हा पण दुधाचा कुठलाही पदार्थ बनवताना आपल्याला नेहमी स्टीलचेच पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी घालूनच घ्यायचं म्हणजे खाली दूध लागत नाही.
2. जेवढे तुम्ही दूध घ्याल त्या दुधामधील थोडंफार तरी दूध आटवून घेतल तर त्या पदार्थाला चांगली चव येते आणि घट्टपणा पण येतो.
3. एकसारखे ढवळत राहिल्याने एका साईडला साय जमा होत नाही एक सारखं दूध चांगलं घट्ट व्यवस्थित होते व पदार्थ पण अगदी छान टेस्टी अप्रतिम लागतो त्यामुळे सारखे ढवळत राहायच
Your Queries:-Sheer khurma
Sheer khurma recipe
How to make Sheer Khurma
Sheer khurma recipe in Marathi
Sweet dish sheer khurma
#sheerkhurma
#sheerkhurmarecipe
#khurma
#hyderabadisheerkhurma
#dailyrecipe
#cooking
Please like, share, comment and subscribe our channel with best wishes.
Thanks for watching ☺️
Негізгі бет शीर खुरमा स्पेशल रेसिपी | Sheer Khurma Special Sweet dish |
Пікірлер: 2