सातबार्यावर लिहलेले भोगवाटदार १, भोगवाटदार २, भोगवाटदार ३ म्हणजे काय पूर्ण माहिती II Sathbara II7/12
कायद्यान्वये जमिनींचे धारणाप्रकार
कायद्याने सर्व जमीन सरकारची असली, तरीसुद्धा सरकार काही स्वतः जमीन कसू शकत नाही; मात्र सोयीसाठी व पुढील व्यवहार हस्तांतरणे सुलभ व्हावीत म्हणून या कायद्यान्वये जमिनींची वर्गवारी केलेली आहे. त्यानुसार (अ) भोगवटादार वर्ग 1, (ब) भोगवटादार वर्ग 2, (क) सरकारी पट्टेदार असे जमिनींचे तीन धारणाप्रकार केलेले असतात.
(अ) भोगवटादार वर्ग 1
1) बिनदुमाला जमीन म्हणजेच इनाम नसलेली जमीन, कायमस्वरूपी व हस्तांतरण करताना कोणाच्याही पूर्वपरवानगीची गरज नसलेली जमीन.
2) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अमलात येण्यापूर्वी जे इसम सदर जमीन कोणत्याही निर्बंधाशिवाय धारण करत होते वा भूस्वामी म्हणून धारण करत होते अशा जमिनी.
3) पूर्वीच्या मध्यप्रदेशातील म्हणजेच आताच्या विदर्भ महाराष्ट्रातील जे जे पूर्वी भूमिधारी म्हणून जमीन धारण करत होते, त्यांनी राज्य सरकारने याबाबतीत केलेल्या नियमास अधीन राहून आकारणीच्या तीन पट रक्कम सरकार जमा केल्यानंतर सदर जमिनी भोगवटादार वर्ग 1 यात समाविष्ट करून घेतल्या असतील अशा जमिनी.
या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही.
(ब) भोगवटादार वर्ग 2
1) ज्या व्यक्ती जमीन नवीन अविभाज्य शर्तीने अथवा निर्बंधास अधीन राहून बिनदुमाला म्हणजेच इनाम नसलेल्या जमिनी कायमच्या धारण करत असतील अशा जमिनी.
2) जे इसम विदर्भातील मध्यप्रदेश महसूल अधिनियमाप्रमाणे निर्बंधासहित भूमिस्वामी हक्काप्रमाणे किंवा भूमिधारी हक्काप्रमाणे कायमचे धारण करत असतील.
3) जे इसम जमीन महसुलाच्या कायद्यान्वये हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधासह भोगवट्याच्या हक्काने इतरत्र जमीन धारणा करत असतील, अशा जमिनी या प्रवर्गात मोडतात. थोडक्यात, नवीन अविभाज्य शर्तीने अथवा नियंत्रित सत्ता प्रकाराने वा तत्सम सरकारी आदेशाने मिळालेल्या जमिनी या प्रकारात मोडतात.
(क) सरकारी पट्टेदार
सालोसाल लागवडीसाठी पट्ट्याप्रमाणे कायमस्वरूपात वा ठराविक खंड देऊन नवीनीकरण करण्याच्या विकल्पावर जमीनधारणा करण्याचा हक्क तात्पुरता वा कायमचा प्राप्त झाला असेल, अशा पट्ट्याप्रमाणे ज्यांना या कायद्याच्या अगोदरपासून बिनदुमाला म्हणजेच गैरइनामी जमिनीतील हक्क प्राप्त झाले असतील. भोगवटादार वर्ग 2 चे मधील दायित्व, जबाबदाऱ्या व बंधने यास अधीन राहून नियम 29 मधील तरतुदी लागू सरकारी पट्टेदार म्हणून असतील.
#sathbara
#भोगवटादार
#सातबाराउतारा
-----------------------------------------------------------------------------------------------------
Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
Follow Us on Twitter: / shikenge
Visit our Website: hamshikenge.bl...
--------------------------------------------------------------------------------------------------
विडियो बनवण्यासाठी चे साधने:-
माइक:-
on amazon amzn.to/2Jcuoqj
on flipkart :- fkrt.it/M~HX62NNNN
ट्रायपॉड:
on flipkart:- fkrt.it/M~1uT2NNNN
On amazon:- amzn.to/2LY0ZhB
कॅमेरा:-
on flipkart:- fkrt.it/j42xNLuuuN
On amazon:- amzn.to/2JfhOTb
Mobile:-
On flipkart:- fkrt.it/j8SKgLuuuN
On Amazon:- amzn.to/2kJiLZk
Laptop:-
On flipkart:- fkrt.it/jZbaQLuuuN
On Amazon:- amzn.to/2JcIFiH
Негізгі бет सातबार्यावर लिहलेले भोगवाटदार १, भोगवाटदार २, भोगवाटदार ३ म्हणजे काय पूर्ण माहिती II Sathbara
Пікірлер: 405