आनंद दौंडे : सोयाबीन पीक रोग व्यवस्थापन. सोयाबीन पीकावर प्रामुख्याने बुरशी, जीवाणू व विषाणू रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. सोयाबीन पिकावर शेंगावरील करपा (पॉड ब्लाईट), सर्कोस्पोरा लीफ ब्लाईट आणि दाण्यांचा जांभळा रंग, सर्कोस्पोरा पानावरील ठिपके (फ्रॉग आय लीफ स्पॉट), मूळकुज/ खोडकुज (चारकोल रॉट), मानकुजव्या (कॉलर रॉट), तांबेरा (रस्ट), जीवाणू करपा, बॅक्टेरियल पोस्ट्युल्स, सोयाबीन मोझॅक, पिवळा मोझॅक विषाणू हे प्रमुख रोग आढळून येतात. तेव्हा सोयाबीन पिकावरील महत्त्वाचे रोग ओळखायचे कशे आणि त्यांचे व्यवस्थापन करायचे कसे याबाबत माहिती घेऊ. रोगांचे व्यवस्थापन केल्यास आर्थिक नुकसान निश्चितच कमी होऊन उत्पादनात भर पडते.
Негізгі бет सोयाबीन पीक रोग व्यवस्थापन
Пікірлер: 4