आनंद साधकाश्रम KZitem Live
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचना स्थान असलेल्या तसेच अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर अर्थात पैसा खांब मंदिर नेवासा येथील अखंड हरिनाम सप्ताहात वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांचे सुंदर असे हरिकीर्तन झाले. श्रोत्यांच्या आग्रहास्तव आम्ही हे कीर्तन येथे उपलब्ध करून देत आहोत. महाराजांनी अत्यंत मार्मिक भाषेत आणि भाविकांना पटेल रुचेल समजेल अशा भाषेत चिंतन मांडले आहे. संतांचा महिमा किती दुर्गम आहे. संतांनी भाषेचे सौंदर्य वाढवले आहे. भाव अक्षराचे गाठी या संत जनाबाई यांच्या अभंगाचा दाखला देत महाराजांनी सुंदर विवेचन केले तसेच तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतीत कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जनजिवा या अभंगावर चिंतन मांडले. यावेळी सचिन महाराज पवार, मयूर महाराज आमले, माऊली महाराज शिंदे सुरेगाव, बाबूराव साळुंके, नजन महाराज आदी मंडळी उपस्थित होती.
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
आमच्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडीओ येथे पहा - / @anand_sadhakashram
Facebook Page
/ anand.sadhakashram
Instagram Account
/ anand_sadhakashram
Do not copy this video.
All rights reserved - Ⓒ Anand Sadhakashram, Bhavinimgaon
#आनंद_साधकाश्रम #livekiratan #mhaskemaharaj #kirtankar
Негізгі бет संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा सप्ताह | देविदास महाराज म्हस्के | तुम्ही संत मायबाप कृपावंत
Пікірлер: 2