संत मृत्यूची भीती कशी घालवतात ?
वारकरी कीर्तन । ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर
जेव्हा स्कॉलरशिपची परीक्षा असते तेव्हा त्या अभ्यासाची, परीक्षेची खूप भीती वाटते. पण त्यामागील संकल्पना जेव्हा समजते तेव्हा ती भिती निघून जाते. त्या विद्यार्थ्याला जेव्हा कळते की, आपल्या शिक्षणासाठी आपल्या आईवडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत, खूप खस्ता खाल्ल्या आहेत, वेळप्रसंगी उपाशी राहावे लागले, आर्थिक ओढाताण झाली, स्वतःचे सुख पाहायला वेळच झाला नाही. विश्रांती घेताच आली नाही. पण आता मी उत्तम अभ्यास करून या परीक्षेत जर उत्तीर्ण झालो आणि स्कॉलरशिप मिळाली की आई-वडिलांच्या डोक्यावरचे केवढे मोठे ओझे उतरणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर विश्रांतीचे, समाधानाचे केवढे गोड हास्य उमलणार आहे. त्यांच्या ऋणातून अंशतः मुक्त होण्याची किती मोठी संधी मिळाली आहे. ही संकल्पना एकदा कळली की त्या परीक्षेची भीती न वाटता त्या परीक्षेबद्दल प्रेम निर्माण होते. कधी ती परीक्षा येते, कधी मी उत्तीर्ण होतो आणि कधी माझ्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहतो अशी अवस्था होते. असेच मरण नावाच्या परीक्षेची भीती; संत कशी नष्ट करतात; याचे मोठे गोड निरूपण ऐकूया हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमोघ वाणीतून.
Overcoming the Fear of Death
Varkari Kirtan
#marathikirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
Негізгі бет संत मृत्यूची भीती कशी घालवतात ? । ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर । KirtanVishwa | The Fear of Death
Пікірлер: 162