#BolBhidu #ChitraWaghAllegations #ShivsenaUBTElectionAdvertise
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. ठाकरे गटाकडून प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरातीत पॉर्नस्टार्सचा वापर केल्याचं चित्र वाघ यांनी म्हटलं. ठाकरेंना महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणायची आहे का, असा सवालही त्यांनी केला. शिवाय आदू बाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बनवलेल्या जाहिरातींमध्ये पॉर्न स्टार महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? असा प्रश्न विचारतायत, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका वाघ यांनी केलीय.
पण या आरोपांनंतर आता स्वत: चित्रा वाघ यांचीच अडचण निर्माण झाल्याचं दिसतंय. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच फैलावर घेतलंय. भाजपच्या काही नेत्यांवर झालेले अत्याचाराचे आरोप, सेक्स स्कँडलमधील सहभाग आणि मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार अशा प्रकरणावरून चित्रा वाघ यांना टार्गेट केलं जातंय. त्यामुळे ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार वापरल्याचा आरोप करणं भाजपवरंच बुमरँग होतंय का? चित्रा वाघ यांनी नेमके काय आरोप केले? यावर जाहिरातीतील अभिनेत्याची प्रतिक्रिया काय आलीय? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? याचीच माहिती आपण या व्हिडीओतून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Shivsena UBT Election Ad: ठाकरे गटाच्या जाहिरातीवर Chitra Wagh यांचे आरोप BJP वर बुमरँग होणार का ?
Пікірлер: 1,1 М.