#सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा गुलालाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. हा सोहळा पाहण्यासाठी सिद्धनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक सह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल झाले होते. मानाची लोखंडी सासने , नवसाची सासनकाठी व पालखी सोहळा ही खरसुंडी मधील श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेचे मुख्य आकर्षण असते. सासन काठी ही नवसाची असते तर सासनकाठीवर उधळण करण्यात येणारे गुलाल-खोबरे हे पण नवसाचे असते. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आज पार पडला.आज मोठ्या उत्साहात श्री सिद्धनाथ देवाची सासनकाठी व पालखी सोहळा मंदिराच्या प्रागणांत पार पडला. यावेळी सिद्धनाथाच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमानावर खोबरे आणि गुलालाची उधळण भाविकानी केली. गुलालाच्या उधळनीने मंदिर परिसर आणि भाविक गुलालात न्हाऊन गेलेले होते. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानाची ओळख आहे.महाराष्ट्, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील भाविक मोठया संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. उद्या रथोत्सवाने या सिद्धनाथच्या यात्रेची सांगता होणार आहे.
Негізгі бет सिद्धनाथ यात्रा खरसुंडी 2023 siddhanath Yatra kharsundi
Пікірлер: 5