#BolBhidu #VijayWadettiwar #MPSC
सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही, तर सगळ्या देशात चर्चा सुरु आहे, ती प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. आधी खासगी गाडीवर लावलेल्या अंबर दिव्यामुळं चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची अनेक प्रकरणं आता बाहेर आली आहेत. ज्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती म्हणजे त्यांच्या दिव्यांगत्वच्या सर्टिफिकेटची. पूजा खेडकर यांनी दिव्यांग नसताना, बोगस दाखला दिला आणि त्याच्याजोरावर आयएएस अधिकारी पद मिळवलं, असा आरोप त्यांच्यावर होतोय, ज्याबद्दल आता युपीएससीही चौकशी करत आहेत. पण या सगळ्यात महाराष्ट्रातल्या दोन अधिकाऱ्यांवरही असेच आरोप झाले आहेत. जे केलेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी.
विजय वडेट्टीवार यांनी, 'पूजा खेडकर यांनी यूपीएससीला गंडवलं, तसाच प्रकार राज्यात देखील एमपीएससीच्या बाबतीत घडला आहे. माधुरी कल्याण नष्टे व अजय कल्याण नष्टे, या दोघांनी दिव्यांग असल्याचं सांगत एमपीएससीला गंडवलं. हे दोघेही उपजिल्हाधिकारीपदावर कार्यरत आहेत.' असे आरोप केले. त्यानंतर सोशल मीडियावरही या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी चर्चा होऊ लागली. तर काही जणांनी या अधिकाऱ्यांची बाजू घेतली. एमपीएससीमध्ये असा प्रकार खरंच घडलाय का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला ? पण वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती काय आहे ? या आरोपांमुळे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चांमधलं खरं नरेटिव्ह कोणतं आणि खोटं नरेटिव्ह कोणतं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Vijay Wadettiwar यांचे Ajay आणि Archana Nashte या अधिकाऱ्यांवर बोगस प्रमाणपत्राचे आरोप, तथ्य किती ?
No video
Пікірлер: 252