बापरे कितीही सुकी मच्छि ! पाहून चक्रावुन जाल 😍 | Kelshi Mohalla, केळशी - Dapoli (Konkan) मित्रांनो केळशी हे गाव दापोली तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. केळशी गावात बऱ्याच आळ्या आहेत तसेच येथे कोकणी मुसलमान लोकांची सुद्धा वस्ती आहे. आमच्याकडे या परिसराला दालदोडी बोलतात. अतिशय प्रेमळ लोकं आहेत ही आणि आमचे त्यांच्याकडे जाणे येणे असते. खास करून मासे खरेदी करायला आम्ही केळशी मोहल्ल्यात जात असतो. केळशी मोहल्ल्यात जाण्यापूर्वी इथे एक मोठा कातळाच्या भाग लागतो. त्या कातळावर दरवर्षी पाऊस संपला की मासेमारी सूरु होते आणि मग इथे मासे सुकवले जातात. केळशी मोहल्ल्यातील लोकं ज्यांना दालदी बोलतात ते मोठ्या अरबी समुद्रात बोटीने मासेमारी करतात. मुबलक प्रमाणात सापडलेले हे ताजे मासे आजूबाजूच्या गावात विक्रीला जातात. सगळेच मासे काही विकून होत नाहीत, मग हे उरलेले मासे कातळावर सुकवले जातात. हे सुकलेले मासे ज्यांना सुकट बोलतात. हे सुकट त्याचे कालवण अतिशय चविष्ट लागते. #SukatMacchi #DryFishInKelshi #KelshiDapoli #sforsatish
केळशीमध्ये तुम्ही दांड्याच्या वडाशी याल तेव्हा तुम्हाला या सुकटांचा वास येईल तेव्हा समजायचे आपण केळशी मध्ये पोहोचलो. बऱ्याच वर्षांपासून येथील लोकं पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. हे मासे कातळावर सुकवण्याचे काम इथल्या महिला करतात. या सुकटांची राखण सुद्धा करावी लागते. अतिशय वाजवी भावात तुम्हाला येथे सुकी मच्छि खरेदी करता येते. येथे सगळ्या प्रकारचे मासे सुकत घातले जातात. मांदेली सुकट, बोंबील सुकट, वाकटी सुकट, करदी, माखली, डोमा, चिरलेली सुकट, मुशी, कोलीम, सोडे, बांगडा, सुरमई असे अनेक प्रकारचे मासे सुकत घातले जातात. आपण सुके मासे खातो खरे परंतु ते कसे सुकवतात हे पाहिलेले नसेल तर तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका!
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет बापरे किती ही सुकी मच्छि ! पाहून चक्रावुन जाल 😍 | Kelshi Mohalla, केळशी - Dapoli (Konkan)
Пікірлер: 185