How To Make Stuffed Mackerel Fish | भरलेले बांगडे | Bharlela Bangda Recipe | Simple & Tasty Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: bit.ly/2DFyOBX
[ Use Code: GS15 ] and get 15% Discount
साहित्य 👉🏽 ५ ताजे बांगडे,
बांगड्यांचा वरचा मसाला तयार करण्यासाठी 👉🏽 मूठभर कोथिंबीर, ५ हिरव्या मिरच्या, १५ लसूण पाकळ्या, १½" आले, १ tblsp लिंबाचा रस, १½ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद आणि चवीनुसार मीठ.
सारण भरण्यासाठी 👉🏽 १ कप भाजलेले सुके खोबरे, १ कप ओल्या नारळाचा खीस, ½ tblsp लिंबाचा रस, ४ त्रीफला, १½ tblsp सफेद तीळ, ½ tblsp खसखस, ½ tsp हळद, ½ tblsp लाल मिरची पावडर, १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp घरगुती गरम मसाला, १० लसूण पाकळ्या, १" आले, अर्धा कप कोथिंबीर, ३/४ हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ.
तळण्याकरिता तेल आणि बांगड्यांच्या आवरणासाठी बारीक रवा.
Homemade Red Masala Recipe 👉🏽 • Agri Koli Homemade Mas...
कृती 👉🏽 प्रथम बांगडे साफ करून त्याला भरण्यासाठी एक खण तयार करून घ्या आणि त्यांना पाण्याने स्वच्छ करून घ्या. बांगड्यांचा वरचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सर मध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आले घालून बारीक वाटून घ्या. तयार वाटण बांगड्यांवर घाला. आता सोबत लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण बांगड्यांना फक्त वरील बाजूस चोळून घ्या. सर्व मिश्रण बांगड्यांना लावून झाल्यावर १५ मिनिटे त्यांना बाजूला ठेवा. आता पॅनमध्ये तीळ आणि खसखस घालून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. मिक्सर मध्ये भाजलेले तीळ, भाजलेले सुके खोबरे, ओल्या नारळाचा खीस, लसूण पाकळ्या, आले, अर्धा कप कोथिंबीर, हिरव्या मिरच्या इत्यादी थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. आता पॅनमध्ये ५ tblsp तेल गरम करून त्यात त्रिफळा घाला. त्रिफळा तेलात फुटू लागली कि तीला बाजूला काढून घ्या. आता याच तेलात सारणाचे तयार वाटण घाला आणि त्यातले पाणी कमी होई पर्यंत तेलात परतून घ्या. वाटणातले पाणी कमी झाले कि त्यात लिंबाचा रस, भाजलेली खसखस, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती लाल मसाला, घरगुती गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून वाटणातुन तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्या. वाटण चांगले भाजल्यावर कोरडे झालेले दिसून येईल. आता या सरणाला ५ मिनिटे थंड करून घ्या. ५ मिनिटानंतर सर्व बांगड्यांमध्ये हे तयार सारण भरून रव्यात घोळून घ्या आणि गरम तेलात कुरकुरीत फ्राय करून घ्या. बांगडे हे माध्यम आचेवरच फ्राय करायचे आणि साधारण एका बाजूने ३ मिनिटे आणि दुसऱ्या बाजूने ३ मिनिटे असा वेळ द्यावा. बांगडे कुरकुरीत झाल्यावर त्यांना गरमागरम सर्व्ह करावं. धन्यवाद !
#Stuffedfish #mackerelfishrecipe #fishfry
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Негізгі бет भरलेले बांगडे रेसीपी | ताजे आणि शीळे बांगडे बाजारात कसे ओळखावे ? महत्वाच्या टिप्स | Stuffed Mackerel
Пікірлер: 706