गावरान पद्धतीने टाकळा भाजी Taklyachi Ranbhaji | पावसाळी रानभाजी Takla (Konkan) पावसाळ्यात कोकणात रानभाज्या खायची एक वेगळीच मजा असते. अशीच पावसात एक रानभाजी बनवली जाते ती म्हणजे टाकळ्याची भाजी. टाकळा ही भाजी अतिशय गुणकारी आहे, तिच्यामध्ये आयुर्वेदिक गुण आहेत. त्वचारोग, वातावर ही भाजी खूप गुणकारी आहे. टाकळा भाजी तयार करणे अतिशय सोपे आहे. कांद्या लसणाच्या फोडणीमध्ये ही भाजी तव्यात गावाला घातली जाते. आपण हेच या विडिओ मध्ये गावरान पद्धतीने टाकल्याची भाजी कशी बनवायची हे दाखवले आहे. कमीत कमी साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने टाकल्याची भाजी तयार करता येते. काही लोकं ही भाजी चण्याची डाळ टाकून बनवतात. परंतु अशी मिठातली भाजी ओले खोबरे टाकून बनवली की भाकरी सोबत खूपच छान लागते. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे अशा आणखी बऱ्याच भाज्या कोकणात गावाला खायची माजा असते. #TaklaRanbhaji #TaklaBhajiRecipe #KonkaniFood #sforsatish
टाकल्याची भाजी तशी दिसायला मेथीच्या भाजीसारखीच असते. टाकल्याची पाने कोवळी असतात तेव्हाच त्याची भाजी बनवता येते. जून झालेले टाकले भाजीसाठी वापरले जात नाहीत. दारची भाजी, चवळीची भाजी, माटाची भाजी अशा बऱ्याच भाज्या पावसात खायला मिळतात. या पावसाळी भाज्या वर्षातून एकदाच नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या पूर्णपणे ऑरगॅनिक असल्यामुळे त्या खूपच औषधी आणि सर्वगुणसंपन्न आहेत. तुम्ही ही टाकल्याची भाजी अशी नक्की बनवा आणि आम्हाला ही भाजी कशी बनते ते आम्हाला जरूर कळवा. आपल्या अशाच गावच्या आणखी रेसिपी नक्की पहा आणि विडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Follow me on Facebook and Instagram
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет गावरान पद्धतीने टाकळा भाजी Taklyachi Ranbhaji | पावसाळी रानभाजी Takla (Konkan)
Пікірлер: 110