दि. २०.०७.२०२४ :
राज्यभरात मुंबई, ठाण्यासह सांगली, कोल्हापूर आणि पूर्व विदर्भात पावसानं चांगलाच जोर धरला आहे.
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे.
नागपूर , भंडारा, वर्धा या जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी साचून रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घरांमध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. काही परिसरात रस्ते वाहतूक बंद झाली आहे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला असून, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यानं धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
वर्धा जिल्ह्यात शिवणफळ आणि उंदिरगावमध्ये असलेल्या नाल्यावरुन पावसाचं पाणी वाहत असल्यानं पूल न ओलांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.हिंगणघाट तालुक्यातला पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. चिमूर परिसरात पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं इरई धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते भामरागड आणि आलापल्ली सिरोंचा महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत माती वाहून गेल्यानं मोठे भगदाड पडलेले आहेत. भामरागड इथल्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यानं १०० गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनचा पावसाचा जोर कमी झाला आहे. दिंडोशी परिसरात सकाळच्या ६ तासांमध्ये ११९ मिलिमीटर या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मुंबईतल्या ग्रँड रोड इथली रुबिना मंजिल इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत.
ठाणे शहरासह भिवंडीतही रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं.
कोल्हापूर जिल्ह्यातले 74 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा ३६ फुटावरून वाहत आहे. . तसेच राधानगरी धरणातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
सांगली जिह्यात शिराळा आणि वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातार, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या 24 तासात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Official KZitem channel of DD Sahyadri News
Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.
DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
Watch our popular bulletins
8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
Follow us on :
KZitem -- / @ddsahyadrinews
Twitter -- / ddsahyadrinews
Instagram -- / ddsahyadrinews
#DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
#DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray
Негізгі бет राज्यभरात मुंबई, ठाण्यासह सांगली, कोल्हापूर आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर.
No video
Пікірлер