#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #manojjarangepatil #hellomaharashtra
मराठ्यांची ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी... आणि त्याला ओबीसींचा होत असलेला विरोध... हे गेल्या एक-दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वास्तव होऊन बसलय... एकीकडे मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरलीय... सरकारनं दोन्ही बाजूंना शब्द दिलाय, त्यामुळे सरकार कुणाची बाजू लावून धरतंय? हे पाहणं महत्त्वाचं आहेच... पण याच सगळ्या गोंधळात पुन्हा एकदा फ्रंटला आलेत ते प्रकाश आंबेडकर.... लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या आंबेडकरांनी मनोज जरांगेंची भेटही घेतली होती... पण याच आंबेडकरांनी लोकसभेनंतर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाल्यावर लक्ष्मण हाके यांची भेट घेत सगेसोयारे हा अध्यादेश रद्द करण्यात यावा, मागील वर्षभरापासून वाटण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र मागे घेण्यात यावे, अशी पक्षाच्या ठरावाद्वारे मागणी केली... थोडक्यात काय तर आंबेडकरांचे पॉलिटिक्स आता मराठ्यांकडून ओबीसींकडे शिफ्ट झालय... पण मराठा आणि मनोज जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीला किती निर्णायक ठरलाय, हे माहीत असतानाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका नेमकी का बदलली? वंचितनं ती स्वतः बदलली की कुणाच्या सांगण्यावरून बदलली? वंचितला येणाऱ्या निवडणुकीला मराठ्यांपेक्षा ओबीसी जास्त इम्पॉर्टंट वाटू लागलेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा विरोध करणं वंचितला महागात पडू शकतं का? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडींग…
The demand for Maratha reservation from the OBC quota has sparked intense political and social debate in Maharashtra. With Manoj Jarange Patil representing Marathas and Laxman Hake advocating for OBCs, the government is caught in a balancing act. Amidst this, Prakash Ambedkar's shifting stance from supporting Maratha reservations before the Lok Sabha elections to backing OBCs raises questions. Has Vanchit repositioned itself for electoral gain? Are OBCs now seen as more crucial than Marathas in the political landscape? The unfolding dynamics will significantly impact Maharashtra's electoral scene.
Keywords :
prakash ambedkar
akola loksabha
vanchit bahujan aghadi
prakash ambedkar speech
prakash ambedkar news
prakash ambedkar live
prakash ambedkar latest news
prakash ambedkar sabha
prakash ambedkar interview
प्रकाश आंबेडकर
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi
Негізгі бет सगेसोयरे अध्यादेश रद्द करावा, Prakash Ambedkar यांच्या मनात हे चाललंय
Пікірлер: 457