सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणात पाऊस मुसळधार पडतोय. शेतीच्या कामांना आता जोर धरला आहे. सध्या गावी फोड सुरू आहे. फोड झाल्यावर शेतातले तण काढले जातात. आमच्या घरी आजी वस्तीला आली होती. माझ्या आईची मावशी म्हणजे आमची आजी, आम्हाला सख्ख्या अजीसारखीच आहे. माझ्या आईची आई होती तेव्हा सुद्धा ती यायची आणि खूप जुन्या गप्पा करायची. जुन्या दिवसांबद्दल बोलायची. आम्ही सकाळी नाश्त्याला साबुदाना खिचडी तयार केली. सकाळी नाश्ता करून शेतावर जायचं असतं. आई, आजी आणि प्रांजु शेतावर गेले. आवण नाही आले म्हणून आम्ही मागून पेरणी सुद्धा केली. दुपारी शेतावर जेवण केले. प्रांजु शेतावर खूप मजा करतेय. कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग पाहण्यारखा असतो. पावसातील कोकण म्हणजे जणू स्वर्ग असतो. दुपारी आजीला सोडायला जावळे गावी गेलो. आजी जावळे गावी गेली तेव्हा पाऊस खूप जोरात आला.संध्याकाळी पुन्हा शेतावर गेलो. या वेळेस आम्ही प्रदनुला शेतावर घेऊन गेलो होतो. शेतात चिखल खूप झाला होता. प्रांजु प्रदनु चिखलात लोळत होते. लहान असताना आम्ही असेच शेतात धमाल करत असू. शेतावर गेलो तेव्हा पाऊस जोरात आला. आम्ही सगळे मिळून शेतावर काम केले. संध्याकाळी घरी येऊन चहा झाला. गावचं कोकणातलं शेतकऱ्याचं जीवन असं आहे. शेतीची कामे सुरू झाली की दिवसभर लोकं शेतात असतात. पेरणी, फोड, बेर झाली की लावणी सुरू होते. आम्ही सध्या कोकणातील आमच्या गावच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहोत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचा सकाळचा नाश्ता शाबुदाना खिचडी आणि शेतावर प्रदनु प्रांजूची मजा दाखवली आहे. प्रदनु शेतावर चिखलात कसा लोळत आहे हे दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #SabudanaKhichadi #SabudanyachiKhichadi #ShetvarGelaPradnu #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan)
Пікірлер: 650