नमस्कार.
खूप जुनी गोष्ट आहे ही! मी जेव्हा शाळेत होते तेव्हा श्रीनिवास शिंदगी नावाचे शिक्षक आम्हाला शिकवत असत. शाळेत जे शिक्षक असतात ते आपले आवडते असले तरी ही पुढे यांच्या गाठीभेटी होतातच असे नाही; परंतू शिंदगी सरांच्या बरोबरचा माझा स्नेहबंध कायम दृढ राहिला. त्यांच्या अनेक बालनाटकांमध्ये मी काम केलं आणि त्यांच्या अनेक गीतांना मी संगीतबद्ध ही केलं. त्यापैकीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आरती! आपल्या आयुष्यात आपल्याला ऊर्जा देणाऱ्या, आदर्श असणाऱ्या आणि अवघड परिस्थितीत घाबरू नकोस असे आपल्या कृतीतून सांगणाऱ्या ज्या थोर व्यक्ती आहेत त्यांच्यापैकीच स्वातंत्र्यवीर सावरकर! सुदैवाने सावरकरांच्या अनेक गीतांना संगीतबद्ध करण्याची संधी "शतजन्म शोधिताना" या स्मारक निर्मित कार्यक्रमामुळे मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि परिवाराशी माझा २००७ पासून एक दृढ बंध निर्माण झाला आहे. स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे , कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि सर्व पदाधिकारी सावरकरांचे साहित्य विविध मार्गाने सर्वांच्या पर्यंत पोचवण्याचे कार्य सातत्याने करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही आरती "तेजोमय तेजोनिधी" या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीतबद्ध करण्याचा योग आला. नृत्यश्री रचित या बॅलेमध्ये मिरजेच्या धनश्री आपटे यांनी आपले कल्पक नृत्यरंग भरले आणि उत्कृष्ट अविष्कार प्रेक्षकांसमोर सादर झाला.
आता पुन्हा एकदा या गीताची पुनर्निर्मिती आम्ही आर्या आंबेकर या सुप्रसिद्ध गायिकेच्या आवाजात करीत आहोत. आर्या ही एक उत्तम गायिका आहेच, त्याच बरोबर नव निर्मिती करण्याचा ही तिचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. सर्वांनी जरूर ऐका, like करा, share करा.
संकल्पना: मंजिरी मराठे, रणजीत सावरकर
निर्मिती: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
गीत : श्रीनिवास शिंदगी
संगीत : वर्षा भावे
गायिका : आर्या आंबेकर
संगीत संयोजन: कमलेश भडकमकर
सहगायक: कलांगणचे यशस्वी
स्वातंत्र्यवीरा तुझी आरती
स्वातंत्र्यवीरा तुझी आरती
शशि-सूर्य ओवाळती भारती ||
तू देशबंधू तू धैर्यसिंधू
हे आर्यपुत्रा तू मात्र हिंदू
तळपे त्रिखंडी तुझी दिव्य दिप्ती
क्रांतीरथी तू महासारथी ||
तू मायमुक्ती तू राष्ट्रशक्ती
साक्षात स्वयंभू तू देशभक्ती
गृह वित्त मत्ता धन दार कीर्ती
स्वातंत्र्य यज्ञी दिली आहुती ||
महाकाव्य वक्तृत्व विज्ञानवाणी
विलसे तुझी लेवुनी वज्रलेणी
तुझी लेखणी खड्ग राष्ट्रार्थ झाली
शत्रूंजयी शब्द-समशेर ती ||
तुझी गाजलेली त्रिखंडी उडी ती
उभी विक्रमी रे दिगंती गुढी ती
तो कोलुकाथ्या सजा अंदमानी
चिरंजीव वीरा तुझी वीर वृत्ती ||
मृत्युंजयी विक्रमी वीर गाथा
हृदयी विराजे तुझी राजसत्ता
नाशावया विस्मृती घोर भ्रांती
ये जन्म घेई पुन्हा भारती ||
गीत: श्रीनिवास शिंदगी
#VinayankDamodarSavarkar #SavarkarSmarakMumbai
Негізгі бет Swatantryaveera Tuzi Aarti | Varsha Bhave | Arya Ambekar | Shrinivas Shindagi | Kamlesh Bhadkamkar
No video
Пікірлер: 41