#BolBhidu #TejasThackerayViralDance #AadityaThackeray
गेल्या अनेक महिन्यांपासून देशात गाजत असलेलं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा मुहूर्त आता जवळ आलाय. १२ जुलैला हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाआधी अनेक आलिशान कार्यक्रम आणि सोहळे पार पडले. अनंत आणि राधिका यांचे गुजरातमधील जामनगर आणि इटलीत दोन प्री वेडिंग कार्यक्रम झाले. तर मुंबईतल्या निता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये संगीत सोहळा तर अंबानींच्या अँटीलिया निवासस्थानी जोडप्याची हळद झाली. या सगळ्या कार्यक्रमांना जगभरातील हाय प्रोफाईल लोकांनी हजेरी लावली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत कार्यक्रमातल्या एका व्हिडिओमुळं राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येतंय. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव सेलिब्रिटीज सोबत मागच्या रांगेत डान्स करताना दिसतायंत. तर दुसरीकडं हळदीनं माखलेले आदित्य ठाकरेही गाडीतून बाहेर पडल्याचा फोटो आला. तेजस ठाकरे यांचा डान्स व्हिडीओ आणि आदित्य ठाकरेंचा हळदीवाला फोटो यामुळं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जातेय. महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारतायत. तेजस ठाकरे यांच्या एका व्हिडीओमुळे राज्यातलं राजकारण इतकं का पेटलंय ? उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्र धर्माचं नरेटीव्ह त्यांच्यासाठीच कसं अडचणीचं ठरतंय, पाहुयात या व्हिडीओतून,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Anant Ambani Sangeet Ceremony मध्ये Tejas Thackeray यांचा डान्स, Uddhav Thackeray यांच्यावर टीका का?
Пікірлер: 361