आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि Valentine Day 😍 | आमच्या लग्नाची गोष्ट - Panvel (Navi Mumbai) आम्ही आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा केला. आमचा लग्नाचा वाढदिवस व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी असतो. वर्षाचं आणि माझं लग्न 14 फेब्रुवारी 2013 मध्ये कोकणातील गावी झाले. आम्ही पनवेलच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला आम्ही घरी प्रथमच बिस्किटापासून केक बनवला. बिस्कीट केक बनवने अतिशय सोपे आहे. आम्हाला अगोदर वाटले की केक कसा होतोय आणि कसा नाय, पण आम्ही बनवलेला बिस्कीट केक खूपच छान झाला होता. प्रांजु आणि प्रदनु खूप खुश होते. सकाळी आम्ही घरी जेवणात मटण बिर्याणी बनवली होती. संध्याकाळी आम्ही घरी आमच्या लग्नाचा केक कापला. आम्ही या व्हिडिओमध्ये आमच्या लग्नाची गोष्ट सुद्धा सांगितली आहे. आमचं प्रेम विवाह आहे की घराच्या मंडळींनी पसंद करून केलेले लग्न आहे हे तुम्हाला आम्ही सांगितले आहे. वर्षाला मी खास व्हॅलेंटाईन डे निम्मित लाल गुलाब देऊन प्रपोज केला तो क्षण लय भारी होता. #MarriageAnniversary #ValentineDay #BiscuitCake #sforsatish
प्रांजूची मैत्रिणी घरी आल्या होत्या. प्रदनु हे सगळं पहिल्यांदाच बघत होता. आम्हाला दोन मुले आहेत. आमच्या लग्नाच्या गोड आठवणी आहेत. मी माझ्या कॅमेरात काढलेलं फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. लग्नाच्या दिवशीचे, हळदीचे आणि घरी आल्यावर असे नेमके काही फोटो आम्ही दाखवले आहेत. आमचं दोघांचं लग्न गावी कोकणात अगदी साध्या पद्धतीने झाले. आम्ही दोघे नवरा बायको आमच्या खूप खुश आहोत. वर्षाने लहानपनापासून दुःख अनुभवलंय आणि आम्ही सुद्धा त्यातून गेलेलो आहोत. आम्हाला आमच्या परिस्थिची जाण आहे. आम्ही आयुष्यात कितीही जरी मोठे झालो तरी आमचे जुने दिवस कधीच विसरणार नाही. आम्हाला ते सगळे दिवस खूप प्रेरणा देतात. आम्ही आईला या दिवशी खूप मिस केले. आई सध्या गावी आहे. आमचा लग्नाचा वाढदिवस खूप छान साध्या पद्धतीने साजरा केला. प्रांजु आणि प्रदनु माझा भाऊ आम्ही सगळे रात्री उशिरा झोपी गेलो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आम्ही त्यासाठी घरी बनवलेला बिस्कीट केक दाखवला आहे. आमच्या लग्नाची गोष्ट तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुध्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि Valentine Day 😍 | आमच्या लग्नाची गोष्ट - Panvel (Navi Mumbai)
Пікірлер: 835